Hard Copy Price:
9% OFF R 75R 68
/ $
0.87
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
`दीपकळ्यांच्या’ समईत बारा व्यक्तिचित्रांच्या ज्योती आहेत. या प्रत्येक ज्योतीला स्वतःचा आकार आणि प्रकाश आहे. या ज्योतींना विझू न देता त्यांना प्रज्वलित करणारी एक तेरावी ज्योती आहे. ती म्हणजे स्वतः पूर्णिमा सुखटणकर! `दीपकळ्या’तील प्रत्येक ज्योतीत या तेराव्या ज्योतीचा प्रकाश मिसळला आहे. `दीपकळ्या’ ही जशी मुलांची कहाणी आहे तशी ती एक संवेदनशील आणि सृजनशील शिक्षिकेचीही आत्मकथा आहे. या आत्मकथेत, मुलांच्या कळ्या कोमेजून जाताना काळजातून उमटलेला एक आर्त करुणेचा स्वर जसा सतत ऐकू येतो, तसाच मुलांवरील निरागस प्रेमाचा एक झरा झुळूझुळू वाहताना दिसतो. करुणा आणि प्रेम हे या आत्मकथेचे मूलस्वर आहेत. या दोन स्वरांच्या हाकेतूनच मुलांच्या काळजापर्यंत पोहोचता येते, त्यांच्याशी संवाद साधता येतो. संवाद आणि सहवासातूनच मुलांच्या समस्या सुटण्याची शक्यता आहे, हा विचार पूर्णिमा सुखटणकर यांनी पुनःपुन्हा अधोरेखित केला आहे.