Summary of the Book
कोणत्याही समाजाची सांस्कृतिक पातळी कितीही उंचावली तरी गुन्हेगारी प्रवृत्ती समाजात राहतेच. आताची गुन्हेगारी ही सर्वव्यापी, शक्तिमान झालेली आहे. तिची झेप प्रचंड आहे; पण सर्वसामान्य माणसाला त्यामुळे भिऊन जायची गरज नाही. विज्ञानाच्या थक्क करणा-या प्रगतीमुळे गुन्हेगार नवनवीन तंत्र वापरून गुन्हे करतो आहे. पण याचीच दुसरी बाजू म्हणजे गुन्ह्यांचं नवीन तपासतंत्र. या तपासतंत्रात अनेक वैज्ञानिक पायावर आधारीत झालेले बदल आणि प्रगती. यामुळे पोलीस यंत्रणा जास्त वेगाने सुसह्यपणे या गुन्हेगारीविरुद्ध ठाम उभी राहत आहे. अशाच आधुनिक तंत्रांचा वापर करून अशक्य वाटणा-या गुन्ह्यांचा शिताफीने उलगडा करणा-या या कथा...