Summary of the Book
अशी एखादी जादूची कांडी आपणही हातात धरावी, असं तुम्हाला कधीतरी वाटलं असेल ना?
एखाद्या निष्णात जादूगाराचे प्रयोग प्रत्यक्ष पाहताना, आपणही असे जादूचे प्रयोग शिकून घ्यावेत आणि इतरांना ते करून दाखवून त्यांना चकित करावं, असंही तुमच्या मनात आलं असेल ना?
तर मग तुमच्यासाठीच हे पुस्तक आहे! यात आरंभी दिलेले विविध प्रयोगांचे फोटो, त्यापाठोपाठ दिलेली जादूविद्येसंबंधीची विस्तृत माहिती आणि अखेरीस 50 आकृत्यांसहित दिलेल्या 25 प्रयोगांच्या खुलासेवार तांत्रिक सूचना यांमध्ये तुम्हाला हवं तेवढं शिकायला मिळेल!