Summary of the Book
गोगलगाय कशी चालते, कबुतर आणि परवा यांच्यातील फरक काय, सर्वांत थंड हवामानाचे ठिकाण कोणते, उष्ण हवेचे फुगे कसे तरंगतात, या आणि आशा अनेक प्रश्नांची उत्तर हवी असतील, तर 'विज्ञान जिज्ञासा' हे पुस्तक जरूर वाचा. केवळ लहानांनाच नव्हे; तर मोठ्यांनाही रोजच्या आयुष्यात विज्ञानविषयक अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तरे संपादक रा. वि. सोवनी यांनी नेमकेपणानं दिली आहेत. ज्ञाननिर्मितीसाठी विचारांना अनुभव आणि प्रयोगाची जोड आवश्यक असते. पुस्तकात जागोजागी दिलेली समर्पक चित्रं पुस्तकाची रंगत वाढवितात.