Summary of the Book
डॉक्टर नीलकंठ रामचंद्र माउस्कर हे पहिल्या महायुद्धात ब्रिटिश आर्मीमध्ये असलेले एक मराठी डॉक्टर. पहिले महायुद्ध हे विविध सीमारेषांवर व निरनिराळ्या छोट्या-मोठ्या देशांमध्ये लढले गेले.डॉक्टरांची नेमणूक मध्यपूर्व भागातल्या बेस कॅम्प हॉस्पिटलमध्ये झाली होती. जेथे (पुढच्या फळीवर) प्रत्यक्ष युद्ध चालू होते तेथील सैनिकांना औषध व इतर सामान पुरवण्याची गरज निर्माण झाली होती. डोंगर-दऱ्यांतून, जंगलांतून प्रवास करत पुढच्या फळीपर्यंत, युद्धाचा भडका उडालेल्या स्थानापर्यंत जाण्याचे अतिशय धोक्याचे व जवळजवळ अशक्य असलेले हे काम स्वीकारण्यास उपलब्ध व्यक्तीपैकी सर्वांनी नकार दिल्यावर डॉक्टरांनी
ही जबाबदारी त्यांचे हे काम नसतानाही आपल्या अंगावर घेतली व दोन घोड्यांच्या सोबतीने एकट्याने पूर्ण केली. कधीही शस्त्र हातात न
धरलेल्या,सैनिक नसलेल्या एका माणसाने आपल्या जिवाचा धोका पत्करून स्वेच्छेने सैनिकांपर्यंत सामान पोहोचवण्याचे व युद्ध चालू असताना स्वतःहून त्या खाईत जाण्याचे धैर्य दाखवले. अशाप्रकारे
पहिल्या महायुद्धात आघाडीवरील सैन्याला रसद पुरवण्यासाठी एका डॉक्टरने एकट्याने केलेल्या या खडतर प्रवासाची ही खरीखुरी चित्तथरारक कहाणी आहे....