Summary of the Book
२१ जुलै १९४२ रोजी नाझी सैन्यानं पोलंडवर आक्रमण केलं आणि झोल्कीव यां छोट्या गावातल्या पंधरा वर्षीय ज्यू मुलीचं, क्लारा क्रेमरचं आयुष्य बदलून गेलं. तिचे मित्र नातेवाईक ठार केले जात असताना किंवा भट्टीत जाळून खाक होण्यासाठी नेले जात असताना, क्लारा नी तिचे कुटुंबीय एका तळघरात लपून जीव वाचवण्यासाठी झगडले. ते देखील कुठेतरी वरकरणी ज्यूद्वेष्टा वाटणाऱ्या बेक नावाच्या जर्मन माणसाच्या घराखाली.