Summary of the Book
भरतकामात कर्नाटकी काशिद्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या कलेत निपुण असलेल्या अनिता चौडापूरकर यांनी कशिदा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून सोनेरी संधी दिली आहे. प्राथमिक डिझाइनपासून अवघड वाटणारी अनेक डिझाइन्स त्या पुस्तकातून शिकवतात. त्यांनी पुस्तकात सर्व डिझाइन्सचे एकूण सात विभाग करून मार्गदर्शन केले आहे.
काठ, गोपूर, कमळ, चार बाजू सारख्या असलेल्या आकृत्या, दोन बाजू सारख्या असलेल्या आकृत्या, एक बाजूला तोंड असलेल्या आकृत्या आणि नेगी व मेथींची डिझाईन्स या सात विभागांतून हा कलाप्रकार शिकता येतो. कोणत्या प्रकारासाठी कोणती साडी अथवा कापड वापरावे, तेही त्या सांगतात.