Summary of the Book
डॉ. रमेश ग. राणे यांनी लिहिलेल्या या पुस्तकात राजस्थानमधून राणे कुळाचे महाराष्ट्रात कसे आगमन झाले ते कळते. कोकण, गोवा, गुजरात, चेन्नई येथे राजापूर समाजाचे राणा येथे येऊन राणे कसे झाले याची सविस्तर माहिती या पुस्तकात आहे. लेखकाने परिश्रम घेऊन विविध ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देऊन, अनेक ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. राणे हे पत्रकार असल्याने त्यांनी माहिती देताना नेमकी दिली आहे. पाल्हाळिकपणा टाळून योग्य तपशील देणाऱ्या या संशोधनपर पुस्तकाने वेगळी माहिती समोर येते. इतिहास संशोधकांनी आवर्जून दखल घ्यावी असे हे पुस्तक आहे.