Hard Copy Price:
R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
हे नाही तर ते डाएट करणं हेच तुमचं आयुष्य बनलं आहे का? चार घास जास्त खाल्ले तर मन खात राहतं का? या फेर्यात अडकलेले तुम्ही एकटेच नाही.
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री याना गुप्ता ही देखील एके काळी या दु:स्थितीतून गेली आहे. वजनामुळे तिच्या जिवाला घोर लागता होता. ‘डाएट... सुखाचं’ ही त्याचीच कहाणी आहे. त्यातून यानानं स्वत:ची कशी सुटका करून घेतली, आहार आणि वजन यांचा समतोल तिनं कसा साधला हे गुपित तिनं या पुस्तकात उघड केलं आहे आणि नेहमीच्या आहारातून व मनाच्या कणखरपणातून कायापालट करणं कसं शक्य आहे याचा गुरुमंत्रही दिला आहे.फरिीडाएट आणि व्यायाम करण्याकरता तुमच्या मनाची तयारी करून घेण्याची जबाबदारी यानानं यशस्वीपणे पार पाडली आहे. स्वत:चं शरीर जसं आहे तसं स्वीकारलं तरच वजन कमी करता येईल; आणि सुख व आरोग्य मिळवता येईल. हे यानाचं साधं, सोपं तत्त्वज्ञान आहे. ते सहजपणे आचरणात आणणं शक्य आहे. प्रेरणादायक आणि नवीन दृष्टी देणारं असं हे पुस्तक शरीराबरोबरच मनाच्या आरोग्याची प्राप्ती करून देणारं रामबाण डाएट सांगतं. हे खरोखरच सुखाचं डाएट आहे.
यानाचे अनुभवाचे बोल तुम्हांला उपदेश करत नाहीत.... मदत करतात. याना काय सांगते - * खाण्याच्या चुकीच्या सवयी कशा सोडाव्या? * नकारात्मक विचारांचं नियंत्रण कसं करावं? * स्वत:वर प्रेम करण्याचे सोपे उपाय. * फक्त अर्ध्या तासात तुम्हांला स्लिम करण्याचं खोटं आश्वासन देणारे ‘पॉवर वर्कआउट’ आणि भुलवणारी डाएट्स यांचा पर्दाफाश. * भरपूर खाऊनपिऊन बारीक होण्याचे मार्ग.
डाएट सुखाचं... डाएट आणि फिटनेसचा नवा मंत्र
आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी, व्यायाम कसा करावा, आदी अनेक गोष्टींवर पुस्तकांचा पाऊस पडत असताना ‘डाएट सुखाचं’ हे अमेय प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेले पुस्तक वेगळी छाप सोडून जाते. सडसडीत बांधा किंवा ‘फिगर’ ही सर्वांनाच हवीहवीशी वाटते. आणि त्यासाठी वाटेल ते उपाय करण्याची तयारी असते. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी बिघडलेल्या असतात आणि पोटाचा नगारा झालेला असतो. तसेच त्यात ‘झिरो फिगर’साठी अट्टाहास म्हणजे शरीराचे नुसते हाल होत असतात.
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री याना गुप्ता यादेखील दुष्टचक्रातून गेल्या आहेत. वजनाच्या काळजीने त्यांच्या जिवाला घोर लागला होता. ‘डाएट सुखाचं’ ही त्याचीच गाथा आहे. या स्थितीतून यानाने कशी सुटका करून घेतली. आहार आणि वजन यांचा समतोल कसा साधला हे गुपित या पुस्तकात तिनं उलगडलं आहे. आपला रोजचा आहार सांभाळून, तो योग्य नसल्यास आवश्यक ते बदल करत ही साधना कशी करावी याचा लेखाजोखा या पुस्तकात मांडला आहे. योग्य डाएट आणि त्याच्या जोडीला सुयोग्य व्यायाम करण्याकरता मनाची तयारी करून देण्याची जबाबदारी यानाने सुयोग्य पार पाडली आहे. आपले शरीर जसं आहे तसं स्वीकारलं तर सुख आणि आरोग्य मिळवता येईल, हे त्यांचे साधे तत्त्व आहे. त्यामुळे हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आणि शरीराबरोबरच मनाच्या आरोग्याची प्राप्ती करून देणारे आहे.
या पुस्तकाचे तीन भाग आहेत. पहिल्या भागात याना गुप्ता वैयक्तिक आयुष्याविषयी बोलतात. त्यांचा जन्म, बालपण, लहानपणापासून असलेली खाण्याची आवड आणि कळत्या वयात त्यावर मिळवलेले नियंत्रण, मॉडेलिंगमधल्या करिअरविषयी लिहितात. काही काळ पुण्यात घालवल्यानंतर मॉडेलिंगसाठी त्या मुंबईत दाखल झाल्या. येथूनच पुस्तकाचा खरा गाभा वाचकांना सापडतो. हवी तशी फिगर मिळवण्यासाठी केलेला जिवाचा आटापिटा, त्यातून झालेल्या यातना आणि सर्व मॉडेल्सच्या अंगीभूत असणारी असुरक्षितता ‘फिगर’ मिळवण्यासाठी केलेले अघोरी उपाय याचे विश्लेषण या भागात करतात व त्यांनी स्वतः डाएट आणि व्यायामाचा मेळ घालत हवी तशी फिगर कशी मिळवली याचे अनुभवकथन आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी वाचकांना उपयुक्त टीप्स दिल्या आहेत. आपल्याला हवं ते खाऊनसुद्धा हवा तसा बांधा मिळवण्याचे सहज सोपे उपाय त्या सुचवतात. स्वानुभवानी दिलेल्या टीप्समुळे या भागाला एक वेगळे परिमाण लाभले आहे.
‘स्वतःवर प्रेम करा’ हे तिसर्या आणि शेवटच्या भागाचे गमक आहे. उत्तम आहारासाठी उत्तम मनःस्थिती असणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी करावे लागणारे छोटे छोटे उपाय सांगितले आहेत. सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे. आपले शरीर जसे आहे तसे स्वीकारले पाहिजे. त्यातूनच बदलांची प्रक्रिया सोपी होते. जोवर आहार, विहार, उपचार याबद्दल असणारे भ्रम आणि गैरसमज काढून टाकत नाही, तोवर ढीगभर टीप्स मिळाल्यातरी त्याचा काडीचाही उपयोग नाही. त्यामुळे उत्तम शरीरस्वास्थ्यासाठी उत्तम मनःस्वास्थ्य असणे अतिशय आवश्यक आहे; तसेच बारीक राहणे म्हणजे फिट राहणे असं नाही. बारीक राहण्यापेक्षा, उठावदार रूपापेक्षादेखील सुखासमाधानानं जगणं महत्त्वाचं आहे. हा संदेश या पुस्तकात वारंवार दिला गेला आहे. तसेच अरुणा अन्तरकर यांनी केलेल्या प्रवाही अनुवादामुळे हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवते. त्यामुळे ‘डाएट सुखाचं’ हे पुस्तक अनोखे आणि वाचनीय ठरते.