Summary of the Book
एक माणूस एका आयुष्यात किती जणांची आयुष्ये जगू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून श्री. सुरेंद्रनाथ उर्फ भाई कांबळी यांचा नामनिर्देश करावा लागेल. अत्यंत समृद्धी, त्यानंतर टोकाची गरिबी आणि पुनः लाखो नव्हेतर कोट्यावधी रुपयांची वार्षिक उलाढाल असा त्यांच्या जीवनाचा सापशिडीचा खेळ आहे. व्यासंगी वाचन, कठोर परिश्रम, तीव्र सामाजिक जाणीव, समाजातील दुदैवी लोकांविषयी कणव आणि सचोटीचे व्यवहार यांच्या बळावर त्यांनी कर्तबगारीचे आदर्श निर्माण केले.
मराठीतील साहित्याचे दोन ठळक भाग करता येतील. व्यावसायिक लेखकांनी लिहिलेली पुस्तके आणि व्यावसायिक लेखक नसलेल्यांनी लिहिलेली पुस्तके, “बदलती क्षितिजे” हे दुसर्या प्रकारातील अगदी वेगळे पुस्तक आहे, “हे जग अधिक सुंदर करावे” हे भाई कांबळी यांचे ध्येय आहे. या ध्येयपूर्तीकडे जाताना त्यांनी जो खडतर प्रवास केला. त्यापासून वाचकालाही खूप शिकता येईल. मराठीतील आत्मचरित्रविषयक साहित्यात “बदलती क्षितिजे” हे एक अविस्मरणीय पुस्तक आहे. “माझा प्रवास”, “माझी जन्मठेप” अशा अमर ग्रंथांच्या मार्गावरील एक प्रवासी म्हणजे “बदलती क्षितिजे” हा ग्रंथ.
रमेश
मंत्री