Summary of the Book
‘टाईम’ या नियतकालिकानं १९२३ ते २००५ या कालखंडातल्या ज्या सर्वोत्कृष्ट शंभर इंग्रजी कादंबऱ्या निवडल्या होत्या त्यात ‘अॅनिमल फार्म’ कादंबरीचा समावेश केला आहे. जॉर्ज ऑरवेल या प्रख्यात ब्रिटिश लेखकाची १९४५ साली प्रसिद्ध झालेली ही कादंबरी एक गाजलेली अभिजात कलाकृती आहे.
उदात्त हेतू मनात ठेवून घडवून आणलेल्या क्रांतीतून जन्माला आलेले शासक किती लोभी, स्वार्थी, कपटी, निर्दयी आणि प्रजेला नाडणारे असू शकतात याचं विदारक चित्र ऑरवेलनं या कादंबरीत रंगवलं आहे.
सन १९४३ च्या काळात ऑरवेलनं रंगवलेल्या अनेक गोष्टी आपल्या देशानंहीं विविध कालखंडात अनुभवल्या आहेत. सध्याच्या आपल्या भोवतालच्या कालखंडातही याचा प्रत्यय ही कादंबरी वाचताना येतो.
व्यक्तिस्वातंत्र्य दडपलं तर काय अनर्थ घडू शकतो याची जाणीव नव्या पिढीला या पुस्तकातून होऊ शकेल, असं वाटतं.