Summary of the Book
वर्णश्रेष्ठत्वाच्या भावनेतून ज्यूंचा अनन्वित छळ करणाऱ्या हुकुमशहा हिटलरसंबंधातील वेगळी माहिती लेखक रणजीत यांनी लिहिलेल्या या पुस्तकात वाचायला मिळते. हिटलरचे प्रारंभीचे कठीण दिवस, ज्यू द्वेषाचे मूळ, पहिले महायुध्द, हिटलरचे आत्मचरित्र माईन काम्फ याविषयीचा मजकूर पुस्तकाच्या आरंभी आला आहे.
हिटलरच्या मिशा, केस, डोळे, त्याच्या आवडी -निवडी, त्याला वाटणारी भीती, वक्तृत्वकला, त्याची स्वप्ने अशी रोचक माहिती पुस्तकात वाचयला मिळते. त्याचे सहकारी, स्त्रियांशी असलेले त्याचे संबंध, विवाह यासंबधातील माहिती समजते.
मुसोलिनी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी त्याचा आलेला संपर्क; तसेच दुसऱ्या महायुद्धाविषयीच्या घडमोडी याविषयीही पुस्तकात लेखन केले आहे.