Summary of the Book
स्त्रियांचा विणकामाचा छंद पूर्वापार आहे. आपल्या हाताने आपल्या प्रियजननांसाठी एखादी वस्तू करणे हा आनंदाचा भाग असतो. विणकामाचे अनेक प्रकार असतात. आणि नानाविध कपडे विणकाम करून तयार करता येतात. विजया किशोर भूलेस्कर यांनी या पुस्तकात विणकामाची ओळख करून दिली आहे. शिवाय नवनवीन प्रकार शिकवले आहेत.
रुमाल, बटवा, मफलर, विविध प्रकारच्या टोप्या, स्कार्फ, शाल, पायमोजे कसे करावेत याची माहिती त्या देतात. एक वर्षाच्या मुलाच्या स्वेटर सेटही त्यांनी शिकवला आहे. क्रोशाचे विणकाम कसे करावे याची इथ्यंभूत माहितीही पुस्तकातून मिळते. क्रोशाचे आसन, रुमाल, टेबल क्लॉथ, तोरण, फुलपाखरू, बंडी, बाळासाठी बूट, टोपडे, मोजे असे प्रकार शिकायला मिळतात.