Hard Copy Price:
25% OFF R 321R 241
/ $
3.09
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
" ज्या वाल्मिक अण्णापासून कांदबरीची सुरुवात होते ते अण्णाचे पात्र जसे सह्रदयी आहे, तसे कष्टाळू व मूल्यवादी आहे. स्वातंत्र्योत्तर काळात समाजात झालेली स्थित्यंतरे व तत्वांची पडझड पाहता हा अण्णा या पातळीवर आपल्या वर्तनातून प्रभावीपणे उभा राहतो.पैशाची लालूच दाखवून बैलाला आारी बसवून दे म्हणणा-या असामीला ठामपणे नकार देणारा, हिरवंगार झाड न कापणारा व दुष्टपणाने वागणाऱ्या चुलत भावाची ढोरं मेल्यावर लहान मुला सारखा धाय मोकलून रडणारा अण्णा अशी त्याची विविध रूपं पानोपानी वाचायला मिळतात. गंगाराम सुतार हे गृहस्थ सुध्दा अशाच पैकी एक! दोन बायका होऊन गेलेल्या वाल्मीकअण्णाला ते आपली लेक कुसुम देऊ करतात. त्यासाठी घरात होणाऱ्या महाभारताला तोंड देतात. बीजवराला आपली मुलगी द्यायला कोणी तयार नसतो. पण वाल्मीक अण्णाची पूर्वीची दोन लेकरं व त्यांंचं दुःख लहानपणी अनुभवलेले गंगाराम आपल्या लेकीची गाठ वाल्मीक अण्णाशी बांधतात. यामागे त्यांचा ना कोणता स्वार्थ असतो ना अपेक्षा ! आईविना असणाऱ्या लेकरांची आबाळ होऊ नये म्हणून हा निर्णय होणारा गंगा'राम' वाल्मीक अण्णाच्या जिवनात ख-या अर्थाने 'राम' आणतो. एवढेच नव्हे तर आपली लेक एकटीच माहेराल
sunil tambe
22 Jul 2022 11 39 AM
*रंधा :- भाऊसाहेबब मिस्तरी*
ग्रामीण जीवनावरती एवढा सखोल आणि सूक्ष्म अभ्यास आजपर्यंत माझ्या तरी वाचनात आलेला नाही. आनंद यादवांच्या झोंबी या कादंबरी सारखच पहिल्या धारेचे लेखन आहे. खूप खूप बारीक गोष्टींचा भाऊसाहेब मिस्तरी यांनी विचार केलेला आहे आणि त्यांच्या लेखनातून तो जाणवत राहतो त्याचे एकमेव कारण मला असं वाटतं की गावगाड्यावर आणि आपल्या मातीवर नितांत प्रेम करणारा माणूसच असे लिहू शकतो. या ठिकाणी ही गोष्ट मला नमूद करूशी वाटते.
भाऊसाहेब मिस्तरी यांच्या
जीवनाची संघर्षाची कहाणी जरी असली तरी त्यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला आपली येणाऱ्या भविष्यकाळात नक्कीच ऊर्जा देऊन जाते आणि म्हणून प्रत्येक वाचकाने ही कादंबरी एकदा तरी वाचावी .
येणाऱ्या काळामध्ये साहित्य क्षेत्रात नक्कीच या कादंबरीची दखल घेतली जाईल आणि येणाऱ्या वर्षांमध्ये
भाऊसाहेब मिस्तरी हे ग्रामीण लेखक म्हणून नावारूपाला येत आहेत, यात मला शंका वाटत नाही..येणाऱ्या काळामध्ये भाऊसाहेब मिस्तरी यांच्या हातून आणखीन चांगल्या प्रकारचे लेखन होवो ही साई चरणी प्रार्थना आणि सदिच्छा🙏
आपलाच .....
सुनील सूर्यभान तांबे
मोशी पुणे..
भ्रमणध्वनी क्रमांक
9552370832