Summary of the Book
भारतात पूर्वी असलेली अनेक छोटी राज्ये मिळून राष्ट्र स्थापन करण्याची संकल्पना सर्वप्रथम आमलात आणली ती चाणक्याने. चंद्रगुप्त मौर्यच्या हाती सर्व सत्ता सोपवून राज्य कसे चालवायचे, हे त्याने कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथातून सविस्तरपणे सांगितले आहे. आदर्श राज्यसंस्थेच्या कसोट्या त्याने सांगितल्या आहेत.
त्याचे अर्थशास्त्र आणि सूत्रे यांच्या आधारे सुशासन कसे असावे, हे डॉ. वसंत गोडसे यांनी सूत्रे चाणक्याची, सूत्रे गव्हर्नन्सची मधून सांगतले आहे. धर्म, अर्थ, राज्य शासनकौशल्य, योग्य शासक बनण्याची प्रक्रिया, राष्ट्रकार्य, परराष्ट्र नीती, शत्रूराष्ट्रे, मित्रराष्ट्रे, पापी, दुष्ट स्वभाव, शिक्षा, उत्साह, आळस याचे फायदे, तोटे, दारिद्र्य, पैशाचे महत्व, गोड बोलण्याचे, संस्काराचे महत्व, भागीदारीतील व्यवसाय, जलसंचयाबद्दल कर्तव्ये, जीवनातील सुखदुःखे, आदी आयुष्यातील, समाजातील, राजकारणातील, धर्मांतील अनेक छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून काय करावे व काय करू नये, हे यातील सुत्रांमधून स्पष्ट केले आहे.