"किल्लेदार" पुस्तकाच नाव..
प्रस्तावना वाचताना नकळत एक एक गोष्टी डोळ्यासमोर फेर धरु लागल्या होत्या... अनिरुद्ध सरांच किल्ल्यांप्रती असलेलं प्रेम,किल्ले संवर्धनासाठी सुरू असलेले प्रयत्न,ती तळमळ मनाला स्पर्शून गेली.प्रस्तावना वाचताना मनात नकळत 'शिव' या पात्राबद्दल कुतुहल निर्माण झालं....
"एकदा का विज्ञानाची शोधयात्रा संपली की माणसाला निसर्गाशिवाय हाती काहीही उरत नाही"
सरांच हे वाक्य अजूनही डोक्यात घोळत आहे...
शिवाचा लंडन ते महाराष्ट्र...आणि मग महारांचे किल्ले...त्याच झालेलं मतपरिवर्तन... सर्व प्रवास अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहतो...
'किल्लेदार' वाचून एक नवा विचार,एक नवी दिशा मिळाली...अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली...
पुस्तक खरंच खूप खूप आवडलं आहे... पुस्तक वाचून २-३ दिवस झाले तरीही शब्द नि शब्द आठवतोय...सगळे पात्र जसेच्या तसे आठवत आहेत... जेव्हा खरंच गड किल्ले मोकळा श्वास घेतील तेव्हा सरांचं लिखाण सार्थ होईल....
सर्वांनी आवर्जून वाचावं असं पुस्तक आहे... नक्की वाचा...
जय शिवराय जय शंभुराजे