Summary of the Book
पर्यायी सांस्कृतिक राजकारण अशी संकल्पना मांडून त्यावर गंभीरपणे उहापोह करणारे हे एक वेगळ्या धाटणीचे पुस्तक. श्याम मुंडे, कसाळे, अनिल जायभाये यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात एकूण १३ प्रकरणांमधून विवेचन केले आहे.
प्रारंभी प्रबोधन आंदोलनाच्या दिशेवर चर्चा केली असून, त्यानंतर राधाकृष्णन यांची स्त्रीविषयक भूमिकाही पुस्तकात स्पष्ट होते. शिक्षणव्यवस्थेला समानतेकडे नेणारी कृती म्हणून पर्यायी शिक्षक दिनाकडे पहिले आहे.
ज्ञानसत्तेचे राजकारण, महात्मा फुले व सावित्रीबाईंचा शिक्षणक्रांतीचा विचार व व्यवहार यांसबंधात भाष्य केले आहे. विद्यापीठीय संशोधन व्यवहारांचे सत्तासंबंधही उलगडले आहेत.