Summary of the Book
लतायात्रेच्या प्रवासडायरीने हळूहळू पुस्तकाचे स्वरूप प्राप्त केले. त्यामध्ये विश्लेषणाचा दृष्टीकोन तर आहेच पण त्याचबरोबर एकांतिक आणि अति-यशस्वी कलाकाराविषयी सहृदयताही. त्यामुळेच हे पुस्तक वाचताना या महान गायिकेच्या काही अज्ञात पैलूंची ओळख होताना लताजींच्या अस्तित्वाचीही जाणीव होते. लेखकाचे म्हणणे आहे, हे केवळ चरित्र नाही तर लताजींच्या रहस्यमय व्यक्तीमत्वाची उकल आहे.