Summary of the Book
सध्याचं मनोरंजनाचं युग जरी दुरचित्रवाणीवरच्या ( टेलिव्हिजनवरच्या) विविध वाहिन्यांच्या चढाओढीचं असलं, तरी दुरचित्रवाणी सुरु होण्याच्या आधीपासून आजपर्यंत मनोरंजनाच्या क्षेत्रात आपलं अस्तित्व स्वतंत्रपणे टिकवून ठेवणारं माध्यम म्हणजे रेडिओ!
रेडिओचं प्रसारण क्षेत्र AM वाहिनीपासून FM वाहिनीपर्यंत विस्तारलं आणि त्याबरोबरच अधोरेखित झालं ते रेडिओवरच्या निवेदकाचं म्हणजेच RJ किंवा रेडिओ जॉकीचं महत्व.
आपल्या ओघवत्या शैलीतून लहान मुलं, तरुण पिढी ते थेट ज्येष्ठांपर्यंत सतत थेट संवाद साधणारे हे रेडिओ जॉकी सगळ्यांच्याच कुतूहलाचा आणि कौतुकाचा भाग.
रेडिओ जॉकी म्हणजे केवळ हजरजबाबीपणा, संभाषणकौशल्य आणि अद्यायावत महितीनं परिपूर्ण असणं एवढच नसतं, तर सादारीकरणासाठी काही नियम आणि व्यावसायिक तंत्रही पाळावी लागतात.
काय आहेत हे नियम? कसं बनावं रेडिओ जॉकी? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तर देणारं त्याचप्रमाणे FM क्षेत्राचा इतिहास सांगणारं अभ्यासपूर्ण पुस्तक.
रेडिओ क्षेत्रात ‘ ऑल इंडिया रेडिओ – आकाशवाणी’ आणि नंतर FM क्षेत्रातही यशस्वी निवेदक म्हणून दिर्घ अनुभव गाठीशी असणाऱ्या स्वाती गुप्ता यांच्या ‘ रोमान्सिंग द मायक्रोफोन : बी अ रेडिओ जॉकी’ या स्वानुभवावर आधारित माहितीपूर्ण पुस्तकाचा हा मराठी अनुवाद.
रेडिओ क्षेत्रात यशस्वी करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक हमखास मार्गदर्शक !