Summary of the Book
झुरमुरल्या कुरणावरती
डोलली फुले सोनेरी,
भेटली नभाला धरती
अशा कवितांसह विविध प्रकारचे लेख या पुस्तकात वाचायला मिळतात. कौशिक नगरकर यांचे हे चिंतन आहे, स्वत:शीच केलेला हा संवाद आहे.
मात्र, या संवादात त्यांनी वाचकांनाही सामील करून घेतले आहे. कारण आसपासच्या घटना, प्रसंगाचा अन्वयार्थ लावण्याच्या त्यांनी प्रयत्न केला आहे. 'पानाने सुखाने डोळे मिटले,' 'चंद्र हाच पृथ्वीची ढाल होऊन इथल्या जीवसृष्टीचे सरंक्षण करीत असतो,' 'फुलपाखरांची (लुनेस्टा)' झोपसुद्धा आजकाल येत नाही,' अशी वाक्ये प्रतिमाचे एक वेगळेच दर्शन घडवतात.
या सगळ्यांला जिवंत करणारी चित्रे ही पुस्तकांची खासियत नगरकर या साऱ्याला अडगळ म्हणत असतील, तर ती समृद्ध अडगळ आहे.
पिकल्या पानाचे मनोगत, सुपरमून, रामभक्त हनुमानाचा पुजारी सीतारामची दिनचर्या वाचनीय आहे. लेखांबरोबरच चहा आरती, रेषा आकाशगंगा, स्तब्ध शेवाळलेले पाणी, साधकाचे वैफल्य, उदास धरती, मस्ती, मी वेडा होतो तेव्हा, पालीवरील लपालीपाल, उपाशी वाघ, सृष्टीचक्र, सोन्याचा रस्ता आदी कवितांमधून मनातील भाव व्यक्त होतात.