Summary of the Book
विंदा रेगे-गबाले ह्या लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. आपला व्यवसाय, संसार आणि देशांतर हे सर्व यशस्वीपणे सांभाळताना अनेक वर्षांपूर्वी लिहायला घेतलेलं हे लेखन पुस्तकाच्या स्वरूपात आज पूर्ण करून विंदा तुम्हा-आम्हाला शब्दरूपानं न्हैचीआडला घेऊन जातात. ह्या अनुभवाला विंदांच्या बोलक्या आणि जिव्हाळ्याच्या भाषेत सादर करताना आम्हाला अतिशय आनंद वाटतो.
मोचेमाड नदीच्या तीराआड लपलेलं कोकणातलं असं हे एक मायाळू गाव न्हैचीआड! ह्या गावानं भरभरून दिलेल्या, उराशी जतन केलेल्या बालपणीच्या अनोख्या आठवणींचा हा अमूल्य ठेवा!