Summary of the Book
तुरुंगातील कैद्यांचा अनुभव एक डॉक्टर म्हणून घेतल्यावर ते अनुभव डॉ. अशोक नाईक यांनी शब्दबद्ध केले आहेत. बेळगाव येथील सेंट्रल प्रिझन हॉस्पिटल येथे सीनिअरमेडिकल ऑफिसर म्हणून त्यांनी काम पाहिले. अनेक कैद्यांवर त्यांनी उपचार केले. एका कैद्याला त्यांनी सन्मार्गाला लावले. अनेक छोट्या-मोठ्या आठवणी त्यांनी ओघवत्या शैलीत सांगितल्या आहेत.