Summary of the Book
कॉंग्रेसचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते व माजी पाटबंधारे मंत्री मल्हारीगौडा शंकरगौडा पाटील यांचे हे आत्मचरित्र.
73 वर्षीय पाटील यांनी कर्नाटकच्या मंत्रिमंडळात काम करताना जे अनुभव आले ते विस्ताराने सांगितले आहेत. मराठी आणि कन्नड यांना जोडणारा हा शब्दसेतू आवर्जून वाचावा असा झाला आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या पाटील यांनी आपल्या कर्तृत्वावर अनेक पदे मिळवली. पुत्र निधनाचा धक्का सहन करूनही त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात बरेच काम केले. या साऱ्या कामाचा तपशील व त्यावेळचे राजकारण या पुस्तकामुळे कळते.