Summary of the Book
जीवनात सर्व ऐहिक सुखे असली तरी सुख - शांती असतेच असे नाही. या साठी योगशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. पतंजली ऋषींची योगसूत्रे काय आहे, हे भगवान कुलकर्णी यांनी 'योगशास्त्र पातंजल योगसूत्रे' मधून सांगितले आहे.
यात समाधिपादमध्ये योगाची व्याख्या, आत्म्याची योगवस्था, चित्तवृत्तींचे स्वरूप, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती व्याख्या, साधनापादमध्ये क्रियायोग, क्लेश, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष , अभिनिवेश, आदींच्या व्याख्या, विभूतीपादमध्ये धारणा, ध्यान, संयम, साधना,
कैवल्यपादमध्ये सिद्धी प्राप्तीचे मार्ग, वासनारहित योगकृत्ये वस्तूंची व्याख्या, चित्ताची रचना, संस्कार कैवल्याचा व्याख्या आदी विस्तृत माहिती यात दिली आहे. ध्यान का करावे, कसे व केव्हा करावे, ध्यानामुळे काय होते, हेही सांगितले.