Summary of the Book
अनाकलीय अशी किचकट कन्स्ट्रक्शन मेथड सहज समजावून सांगून, त्यातील खाच-खळगे आधीच दाखवून आमच्या भावी क्लायंटस् आणि आर्किटेक्चर प्रोफेशन या दोहोंची एक प्रकारे सेवाच झारापकरांनी केली आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे.
- प्रा. शिरीष देशपांडे, पास्ट प्रेसिडेंट, इन्डियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् फॉर्मर हेड ऑफ डिपार्टमेन्ट ऑफ आर्किटेक्चर, व्हिआरसीई, नागपूर.
पूरिपूर्ण ज्ञान व दीर्घानुभव या दोन्हीचा मिलाप यामुळे हे पुस्तक परिपूर्ण वाटते. सर्वसामान्य माणसाला ते पूर्ण मार्गदर्शक ठरेल, एवढेच नव्हे तर आर्किटेक्चर/सिव्हिल इन्जिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना, तसेच नव्याने ह्या व्यवसायात शिरकाव करू इच्छिणार्यानाही हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक आहे.
- आर्किटेक्ट रवी पारुंदेकर, नॅशनल कौन्सिल मेम्बर ऑफ आय.आय.ए. 1994-98 ,चेअरमन यंग आर्किटेक्टस् कमिटी 1994-96 व 1998-2000 चेअरमन मेम्बरशीप अँड पब्लिक रिलेशन बोर्ड, आय.आय.ए. 1996-98
माझ्या 40 वर्षांच्या अध्यापनाच्या व्यवसायात अखेरीला हे पुस्तक हाती आले. तत्पूर्वी पाश्र्चिमात्य तांत्रिक पुस्तकांवर व त्यांना अभिप्रेत असणारी, त्यांच्या परिसरात सुयोग्य असणार्या तांत्रिक माहितीच्या आधारावर आम्ही अवलंबून होतो. ह्या पुस्तकामुळे आपल्या अवतीभवती उपलब्ध असणार्या साहित्य, कामगार व अवजारे यायोगे सुयोग्य बांधकामाची घडण, तसेच यासाठी आवश्यक त्या नीतिनियमांचा उपयोग कसा करावा यासंबंधीचे विवेचन नुसतेच वाचनीय नव्हे, तर योग्य त्या सुबक आराखड्यांमुळे दर्शनीय झाले आहे.
-आर्किटेक्ट अरुण झारापकर