Summary of the Book
''पन्नास वर्षांहूनही अधिक काळ अडवाणीजी माझे मित्र आणि निकटवर्ती सहकारी राहिले आहेत. राष्ट्रवादावरील अतूट श्रध्देशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही आणि तरीही वेळोवेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीच्या गरजेनुसार राजकीय प्रतिसाद देताना आवश्यक ती लवचीकतासुध्दा त्यांनी दाखवली आहे. माझी अशी खात्री आहे की, 'देश माझा, मी देशाचा' या त्यांच्या पुस्तकाला मोठया संख्येने वाचक मिळतील; कारण त्यात एका संवेदनशील माणसाच्या लक्षवेधी जीवनप्रवासाचे प्रतिबिंब पडले आहे... आणि अशा एका लोकविलक्षण नेत्याचेही की, ज्याच्या कारकिर्दीचा सर्वोत्तम टप्पा माझ्या अपेक्षेप्रमाणे अजूनही यायचा आहे. तो लवकरच यावा, अशी माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे!''
- भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी