Summary of the Book
स्मिता शेखर कोरडे मुळच्या पुण्याच्या . हुजूरपागा येथे शालेय आणि बी . एम् . सी . सी . ला महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे .
शालेय जीवनापासून निबंध , लेख , कविता लिहिण्याची आवड . शाळेच्या आकाशवाणीवर तसेच पुणे आकाशवाणीवरही अनेक स्वलिखित कार्यक्रम केलेत .
महाराष्ट्र साहित्य परिषदेची प्राज्ञ शालेय जीवनात उत्तीर्ण .
गेली पस्तीस वर्ष अहमदाबादलाच स्थित आहेत.
अहमदाबाद मध्ये साहित्य, काव्य यासाठी निरनिराळे कार्यक्रम करत राहणाऱ्या 'विविधा' ग्रुपच्या अध्यक्ष म्हणून चार वर्षांहून ही अधिक काळ काम केले आहे. अनेक कार्यक्रमांचे निवेदन यशस्वीपणे केले आहे. हेही एक आवडते काम.
महाराष्ट्र समाज, भद्रच्या शिक्षण सचिव म्हणून २०१३ -२०१४ मध्ये काम केले आहे. तसेच, मराठी समाजच्या समाज पत्रिकेच्या संपादक म्हणून दोन वर्ष जबाबदारी निभावली आहे.
'मराठी माणूस' या अहमदाबादहून प्रकाशित होणारया मासिकात अनेक लेख, मुलाखती, स्तंभलेखन, सदर- ' स्नेहस्पर्श' प्रकाशित.