Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
‘कोसला’ जशी महाविद्यालयीन युवकाच्या मनाचं, जगण्याचं आणि पर्यावरणाचं अस्सल चित्रण करते, तसंच ’ कॉलेज नावाच्या गुलमोहराखाली’ तितक्याच अस्सलपणे कॉलेजातील युवकाचे भावविश्व उलगडते. दोन साहित्यकृतींत तुलना करणं खरं तर तितकंसं प्रशस्त नसतं, पण इथे ’कोसला’ आणि कॉलेज नावाच्या गुलमोहराखाली’ या लोकप्रिय कादंबर्यांरचा एकत्रित विचार करावासा वाटतो खरा. कॉलेज नावाच्या गुलमोहराखाली’ ला ‘कोसला’इतकी किंवा कदाचित थोडी कमी लोकप्रियता मिळाली असेल; पण श्रेष्ठत्वाचं माप ‘कोसला’च्या पदरात अधिक का पडलं? दोन्हींतही सामाजिक दंभस्फोट पुरेपूर आहे. फरक इतकाच, की ‘कोसला’ जगण्याचा समग्रतेनं विचार करते, जगण्याच्या प्रयोजनांपाशी पोचते. खर्यास अर्थानं श्रेष्ठ ‘कादंबरी’ होते. ’ कॉलेज नावाच्या गुलमोहराखाली’ ’ एखाद्या उत्कट तानेसारखी मनाला भिडते, व्याकुळही करते, पण जगण्याचं समग्र भान देत नाही. अर्थात मर्यादा म्हणजे उणेपण नव्हे. त्यामुळेच कॉलेज नावाच्या गुलमोहराखाली’ ही सुंदर आणि निर्दोष असूनही सर्वकालीन आणि सार्वत्रिक श्रेष्ठतेच्या काही पावलं अलीकडेच थांबते.