Summary of the Book
सन १९८८ पासून अशोक देशमुख योगाच्या प्रचारात सक्रीय .टाटा मोटर्समध्ये सेवेत असताना त्यांनी सन १९८८ ते २००० या कालावधीत १०हजार लोकांना योग शिक्षण दिले.
सन २००० साली स्वेच्छा निवृत्ती घेऊन तणावमुक्ती प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली . आजपर्यंत त्यांनी यशदा,टाटा मोटर्स ,एस.टी. कर्मचारी, महाराष्ट्र पोलीस , मर्सिडिस ,फोरबेस मार्शल ,एल .जी., के.एस .बी ., कॅटबरी ,अपोलो टायर्स, कोकाकोला, महिंद्रा अँड महिंद्रा आणि मंत्रालय यांच्यासाठी ताणतणाव निर्मुलनासाठी कार्यशाळा घेतल्या .आजपर्यंत विविध संस्थांसाठी तणावमुक्ती या विषयावर ७००० हून अधिक व्याख्याने दिली.यापूर्वी त्यांनी तणावमुक्ती हे पुस्तक प्रकाशित केले होते .आता नव्याने 'हसत खेळत तणावमुक्ती 'हे पुस्तक लिहून या मार्फत ताणतणाव नाहीसा कसा करायचा याबाबतचे धडे दिले आहेत.हे पुस्तक सरकारी अधिकारी -कर्मचारी ,महिला ,ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे .