Hard Copy Price:
R 120
/ $
1.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
17% OFFR 120R
100
/ $
1.28
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
सुरेखा कोरे यांचा " मानसी प्राजक्त फुलताना " हा कवितासंग्रह वाचताना आपण त्यात रंगून जातो. 'दोन शब्द' या कवितेत त्यांनी वेगवेगळ्या भावना लेवून येणार्या शब्दांची महती सांगितली आहे. 'तुझीच सावली' या कवितेमधून आईचे लेकीबद्दलचे प्रेम, विश्वास व्यक्त केला आहे.मनामनांची नाती जपणार्या 'आठवणीं'ना त्यांनी आपल्या कवितेत मानाचं स्थान दिलं आहे. 'स्वप्नां'ना जीवनातील तापांवरचा उःशाप म्हटलं आहे. नोकरी करणार्या स्रियांची वेदना कवितेत मांडताना भावनाप्रधान होणार्या या कवयित्रीने 'बुफे', 'पंगत' यासारख्या कवितांमधून आपल्या स्वभावातील मिश्कीलपणाही दाखवला आहे.आधुनिकतेच्या वार्याने लयास चाललेली 'चाळसंस्कृती'बद्दल हळहळ व्यक्त करताना आॅफीसच्या कामासाठी काॅम्प्युटरशी करत असलेली हातमिळवणीही मोकळेपणाने मांडली आहे.
दैनंदिन जीवन जगताना मनात होणारी भावनांची भरती-ओहोटी कवितेत व्यक्त करणार्या सुरेखाताईंच्या अजून कविता आम्हा रसिकांना वाचायला नक्कीच आवडतील. त्यासाठीच्या वाटचालीसाठी सुरेखाताईंना शुभेच्छा !
Sunetra D. Ranade
29/08/2020
Liked your 'Kavyasangraha'. All poems are very sensitive, emotional & nicely worded. When are you planning your next book ?