Summary of the Book
आयुष्य हे अनेक गोष्टींनी भरलेले आहे. अनेक घटना, प्रसंग, व्यक्ती आपल्याला जीवनभर लक्षात रहातात. त्यांच्याविषयीची मते, राग-लोभ व्यक्त करण्यासाठी शब्दांचा आधार घेतला जातो. पण ते शब्द काव्यातून व्यक्त झाले की त्याची खोली अधिक जाणवते. दीप्ती पेठे यांनी शब्दांच्या ओढीने
आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
'तश्नगी' या हिंदी काव्यसंग्रहातून जगण्याची हिंमत, जिवलगांची आठवण, आयुष्यात जाणवणारे रितेपण, संभ्रम, विविध प्रसंग त्यांनी समर्पक शब्दातून व्यक्त केले आहेत. हिंदी काव्य असल्याने शब्दांचे समानार्थी शब्द दिलेले आहेत.
त्यांच्या 'अल्फाज'ला गुलजार यांच्या प्रस्तावनेचे कोंदण लाभले आहे. 'मै जुनून हूँ, तेरी आस हूँ, तेरी तश्नगी, मै तेरी प्यास हूँ, तेरी दर्द हूँ, मै तेरी दवा भी हूँ, एक बार तू दिलपर हाथ रख बनके तेरी धडकन मै तेरे पास हूँ!' असे म्हणत दीप्ती त्यांनी जीवनाचे कंगोरे यातून उलगडले आहेत.