Hard Copy Price:
R 140
/ $
1.79
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
तोत्तोचान (स्वतः लेखिका) ही एक चंचल, शाळेतून काढून टाकलेली, खोडसाळ (?) शिक्षकांसाठी पण तरीही कुतूहलपूर्ण, उत्तम सामाजिक जाण असलेली प्रेमळ, आनंदी, धडपडी आणि निरागस चिमुरडी आहे. तिचं लहानपणीचं भावविश्व, तिचे पालक, लाडकी "तोमोई' शाळा आणि तिचे अनोखे मुख्याध्यापक कोबायाशी, त्यांचे शिक्षणविषयक नावीन्यपूर्ण उपक्रम, तळमळ, मुलांवरचा अतीव विश्वास...हे सारं आणि अजून खूप काही सांगणारं "तोत्तोचान.' (मूळ लेखिका : तेत्सुको कुरोयानागी, अनुवाद : चेतना गोसावी) कोबायाशींच्या मते, सगळी मुलं स्वभावतः चांगलीच असतात. तो चांगुलपणा रुजवणं आणि मुलांची वैयक्तिकता टिकवणं महत्त्वाचं असतं. स्वाभाविक व नैसर्गिक वाढीसाठी मुलांना शिक्षणाबरोबरच क्रीडा, संगीत निसर्ग, चित्रकला यांच्या जोडीला मुलांवर अथांग प्रेम करणारे पालक व शिक्षक मिळणं फार गरजेचं आहे. शाळांचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकमुक्त असावा, शिक्षण हसत-खेळत चालावं, असं त्यांना वाटे. तोमोई शाळेतले अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम, खेळ, गमती आपल्या शिक्षणपद्धतीत कदाचित अति आदर्शवादी वाटतील; पण तरीही शिक्षणासंबंधी प्रेम, आस्था असणाऱ्या प्रत्येकाने वाचलंच पाहिजे, असं हे पुस्तक!
टोटोचान – खिडकीजवळची छोटी मुलगी हे पुस्तक खूप सुंदर आणि प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून आपल्याला कळते की प्रत्येक मुल वेगळे असते आणि त्याला समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
या पुस्तकात शिक्षणाची एक चांगली पद्धत दाखवली आहे जिथे मुलांना मोकळेपणाने शिकण्याची संधी दिली जाते. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना शिकायला आवडते.
हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचावे असे आहे.
Prajakta Vaibhav
13 Jul 2019 03 51 PM
अतिशय सुंदर, मनोवेधी पुस्तक
प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासोबत वाचलेच पाहिजे असे सर्वांग सुंदर पुस्तक. शुभेच्छा, धन्यवाद
Rushikesh Dabholkar
21 May 2013 11 20 AM
Best book! each Parent / to-be parent / was-parents / may-be-parents / non-parents ;) must read