Summary of the Book
हे युग व्यवस्थापन युग आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये; परंतु व्यवस्थापन म्हणजे नेमके काय, ते कसे करायचे, ते करण्याचे तंत्र काय असते याची विस्तृत माहिती प्रा. डी. बी. पाटील, डॉ. डी. डी. भक्कड आणि डॉ. एन. बी. गोसावी यांनी या पुस्तकात दिली आहे.
व्यवस्थापन आणि व्यवसाय, प्रमंडळ आणि प्रमंडळ संस्कृती, जागतिक व्यवस्थापन परिस्थिती, जपानचे व्यवस्थापन, व्यावसायिक व्यवस्थापन आणि जोखीम संवेदना व्यवस्थापन, सेवा व्यवस्थापन आणि ज्ञान व्यवस्थापन या पुस्तकाच्या एकूण सात भागांत लेखक त्रयीने विषय स्पष्ट केला आहे.
व्यवस्थापन विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल अशी पुस्तकाची रचना असून, प्रत्येक प्रकरणाचा शेवटी स्वाध्याय प्रश्न व टिपा देण्यात आल्या आहेत. प्रश्नपत्रिकेचे नमुनेही दिले आहेत.