Summary of the Book
काकस्पर्श - हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आणि वाटचालीतील, तसेच गेल्या ६० वर्षांमध्ये प्रथमच प्रकाशित झालेले, मराठी चित्रपटाचे "Making" असलेले "कॉफीटेबल बुक." ह्या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत एक स्वतःचा असा वेगळा इतिहास रचलाच, पण ज्याने नुसती प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत तर त्यांच्या मनात स्वतःच असं एक वेगळ स्थान निर्माण केलं. ह्याच चित्रपटाचा चित्रमय प्रवास पुस्तक स्वरुपात प्रकाशक "राहुल मेहता" ह्यांनी मांडला आहे. "श्री प्रताप पाटील" ह्यानी चित्रपटातील प्रसंगांचे आणि निर्मितीक्षणांचे सुंदर लेखन करून आणि "बाबासाहेब खाडे" ह्यांनी चित्रपटातील सर्व व्यक्तिरेखांबरोबर संवाद साधून त्यांचे अनुभव, शब्दांकित करून आपल्याला चित्रपटाच्या चित्रमय प्रवासाचा जणू अनुभव ह्या पुस्तकाद्वारे दिला आहे. रंगीत पाने, आकर्षक मांडणी, चित्रपटातील व्यक्तिरेखेशी निगडीत फोटो आणि पुस्तक अधिकाधिक माहितीपूर्ण व्हावे ह्यासाठी घेतलेली मेहेनत हि हे पुस्तक आपण हातात घेतल कि लक्षात येते. चित्रपट रसिकांची मने जशी "काकस्पर्श" ने जिंकली तसेच "पार्श्व पब्लिकेशन" चे हे "कॉफीटेबल बुक" सर्वांची मने जिंकेल हे नक्कीच!