Summary of the Book
कॅन्सर एखाद्या घरात शिरला की त्या पेशंटला पहिला प्रश्न पडतो ,"मलाच ही शिक्षा का ?", आणि त्यानंतर मनातल्या मनात जणू काउंटडाऊन सुरु होते आयुष्याच्या उरलेल्या दिवसांचे...कॅन्सर म्हणजे खरोखरच फक्त मृत्यू ? जगभरात विज्ञानाने प्रगतीच्या वाटेवर अविश्वसनीय अशी मजल मारलेली असतना कॅन्सरसारख्या मोठ्या शत्रूकडे विज्ञान दुर्लक्ष कसे करील? खरे म्हणजे विज्ञानाने चांगलीच वेसण घालून नमवले आहे. आता कॅन्सर म्हणजे नुसता मृत्यू नाही, तर कॅन्सर नंतरही आयुष्य आहे. उमेदीचे, रसरशीत. कॅन्सरच्या दहशतीच्या सावटातून बाहेर काढणारे आणि कॅन्सरची डोळस ओळख करून देणारे पुस्तक. प्रथमच मराठीत.