Summary of the Book
त्यांना 'स्टार' व्हायचं असतं.
नाटक - टिव्ही - सिरियल - बॉलीवूड अशा शिड्या चढत चढत पैसा आणि प्रसिद्धी कमवायची असते.
ही असली ग्लॅमरस स्वप्नं घेऊन जायचं कुठे ? तर मुंबई !
तरूण मुलं - मुली जीवाच्या करारानं
धावत सुटतात.
ग्लॅमरच्या अथांग सागरात उडी मारतात...
तरतात... बुडतात... नुसतेच हातपाय मारतात, पण जगतात.
सुखदु:खाची, जिद्दीची, नैराश्याची त्यांची म्हणून दुनिया आहे.
लोळागोळा होऊन निर्मात्यांच्या पायाशी वळवळणारी,
शरीराचा सौदा करून एक संधी मागणारी,
कधी संतापाचा फणा काढून खुन्नस धरणारी,
स्वाभिमानाने ताठ मानेने उभी राहणारी;
तर कधी लाचारीचा कळस गाठून
जन्माची गुलामी कबूल करणारी...
'स्ट्रगलर्स'ची दुनिया !