Summary of the Book
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं निमित्त साधून प्रसिध्द लेखक प्रवीण दवणे यांनी कुसुमाग्रज नावाचं आकाश धुंडाळायला सुरुवात केली आणि त्यांना कुसुमाग्रजांच्या कवितेचे विविध पदर उलगडत गेले. त्यातूनच मग विद्यापीठं, ग्रंथालयं आणि साहित्यमंडळांमधून त्यांच्या कवितांशी संवाद साधलेल्यांसाठी नव्हे; तर ज्याला कविता आवडू शकते, पण काही कारणामुळे जो कवितेपासून दूर राहिला आहे, अशा व्यवसायमग्न समाजासाठी प्रवीण दवणे यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. 'सूर्यपूजक' कुसुमाग्रज हे सूत्र घेऊन त्यांनी वर्षभर ठिकठिकाणी कार्यक्रम केले आणि त्यांना मोठा प्रतिसादही लाभला. त्यातून दवणे यांनी पंधरा ते सोळा पैलूंतून कुसुमाग्रज मांडले, जे या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत.