Summary of the Book
डॉ. अविनाश भोंडवे यांचे हे पुस्तक पौगंडावस्थेतील आणि तारुण्याच्या उंबरठ्यावरील सर्व मुलांना मार्गदर्शन करणारे आहे. मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत येथे शास्त्रीय माहिती देण्यात आली आहे.
लैंगिक विकृतीपासून दूर ठेवण्यासाठी, तसेच लैंगिक विकृतीला बळी न पडण्यासाठी मुळात या विषयाची पुरेशी माहिती असायला हवी. अर्धवट वय व कुतूहलापोटी नको त्या ठिकाणाहून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये नुकसानच होते. शास्त्रशुद्ध माहिती आणि तीही रंजकपणे येथे दिली आहे.