Summary of the Book
स्त्रीसक्षमीकरणाशी संबंधित वेगवेगळ्या पैलूंचा वेध घेणाऱ्या लेखांचा हा संग्रह. मोहिनी कारंडे यांनी त्याचं संपादन केलं आहे. वेगवेगळ्या समूहातल्या स्त्रियांचे प्रश्नव आणि समस्या वेगळ्या आहेत. त्या सर्वांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न पुस्तकात करण्यात आला आहे.
‘अपंग महिलांच्या समस्या’, ‘बचत गटांची झेप’, ‘गोष्टी अनाथ मुलींच्या’, ‘प्रशासनातील स्त्रीसक्षमता’, ‘स्त्रीसक्षमीकरणात कायद्याचा आधार’, ‘महिलांचे राजकीय सबलीकरण’, ‘स्त्रीसक्षमीकरणात पुरुष सहभाग’ आदी लेखांचा पुस्तकात समावेश आहे. परंपरांच्या जंगलात हरवलेला डॉ. माधवी खरात, नीला सत्यनारायण, डॉ. वृषाली रणधीर, ॲड. सुप्रिया कोठारी, प्रयागा होगे, डॉ. बेनझीर तांबोळी, डॉ. उज्ज्वला हातागळे आदींनी वेगवेगळ्या विषयांवर लेखन केलं आहे.