Summary of the Book
उद्योगप्रधान होत जाणा-या, धीरेधीरे भल्याबु-या स्वरूपातील औद्योगिक संस्कृतीला सामोरे जाऊ बघणा-या आपल्या समाजातील बदलत्या मानवी अनुभवांचे वेध कथा-कादंबरीतून घेण्याचा प्रयत्न करणारे लेखक ह. मो. मराठे यांची ही कादंबरी. एका पातळीवर ती मॅनेजमेंट फिलॉसॉफी नामक प्रकाराचा दंभस्फोट करते, तर दुस-या पातळीवर दिवसेंन्दिवस अधिकाधिक संमिश्र आणि परस्परावलंबी बनत चाललेल्या सामाजिक, आर्थिक संबंधांमुळे होणारी माणसांच्या जगण्याची कोंडी चित्रित करण्याचा प्रयत्न करते.