Summary of the Book
अष्टपैलू अभिनेते श्रीकांत मोघे यांचे हे आत्मकथन आहे. वैभव वझे यांनी त्याचे शब्दांकन केले आहे. बालपण, कौटुंबिक जीवन, शिक्षण, अभिनय, नायक, चित्रपट या टप्प्यांतील हे विविधांगी चरित्र आहे.
अंमलदार, अपूर्व बंगाल, तुझं आहे तुजपाशी, कृष्णाकाठी कुंडल, जावयाचे बंड, आंधळ्यांची शाळा, लेकुरे उदंड झाली, अजून यौवनात मी, गारंबीचा बापू, वाऱ्यावरची वरात, अश्रूंची झाली फुले या लोकप्रिय नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.
प्रपंच, नंदिनी शेवटचा मालुसरा, मधुचंद्र, दैव जाणिले कुणी, आम्ही जातो अमुच्या गावा अशा १९७० पूर्वीच्या चित्रपटांप्रमाणेच वासुदेव बळवंत फडके, सावर रे अशा अगदी अलीकडील चित्रपटामध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. मालिकांमध्ये काम केले. या अनुभवांचे रसाळ चित्रण पुस्तकात आले आहे.