Summary of the Book
आपल्या वडिलांच्या नजरेत भरण्याजोगं, त्याचं कौतुक मिळवण्याजोगं काहीतरी करण्यासाठी आसुसलेला बारा वर्षांचा आमिर पतंगांची स्थानिक दंगल जिंकण्याचा निर्धार करतो. त्याचा इमानी दोस्त हसन त्याला मदत करण्याचं वचन देतो. पतंगाच्या दंगलीच्या दिवशी संध्याकाळी घडलेल्या, एका घटनेमुळं दोघांचं भावविश्व उध्वस्त होऊन जातं....
1970 च्या दशकात रशियन फौजांनी अफगणिस्तानावर कब्जा केल्यानंतरही आमिरच्या मनात एक जाणीव सतत जागृत असते ती म्हणजे एक ना एक दिवस,कधीतरी त्याला जरूर परतावं लागणार आहे. नव्या जगातलं त्याचं समुद्ध आयुष्यही त्याला कधीच देऊ शकणार नाही, अशा गोष्टींसाठी- ती म्हणजे प्रायश्चित्त ! त्याच्या हातून घडलेल्या अक्षम्य गुन्ह्याचं प्रायश्चित्त !