Summary of the Book
कुटुंबनियोजन किंवा संततीनियमन करून लोकसंख्या मर्यादेत ठेवल्याशिवाय वैयक्तिक आरोग्य वा समाजस्वास्थ ही दोन्ही मिळवता येणार नाहीत हे ठामपणे समाजाला बजावणे हे रघुनाथराव कर्वे यांच्या जीवितकार्याचे सूत्र होते. आज सर्वसामान्य असलेल्या या सूत्राचा पाठपुरावा कर्व्यांनी ज्या काळात केला तेंव्हा ती जगावेगळी लढाई होती आणि ही जगावेगळी लढाई या जगावेगळ्या व 'छोट्याश्या तरीही अफाट छातीच्या माणसाने' एकांड्या शिलेदारासारखी अखेरपर्यंत कशी लढविली तिची हकीगत हा या बखरीचा विषय आहे.