Summary of the Book
प्रिय मुंबई देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईविषयी माहिती मिळवावी तेवढी थोडीच आहे. कारण मुंबईसमजणे सोपे नाही. तरीही मधुवंती सप्रे यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला निराळी मुंबई अनुभवायला मिळते. मुंबई विद्यापीठ, वाळकेश्वर, मलबार हिल, जहांगीर आर्ट गॅलरी, यांसारखी प्रसिद्ध ठिकाणे पाहायला मिळतात.
याशिवाय मुंबईच्या वास्तू, इमारती, बस व्यवस्था, लोकल, शिवाजी टर्मिनस, उपनगरे, बंदरे, नाटकं, सिनेमा, गणेशोत्सवासारखा सण,वृत्तपत्रे, पुस्तके, ग्रंथालय, श्रीमंती-गरिबी, समुद्र, मुंबईची हवा, पाणी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही प्रसंगानेखचून न जाता दुसऱ्या दिवशी काळाबरोबर पुन्हा धावणारा मुंबईकर या सगळ्यांची एक झलक या पुस्तकात वाचायला मिळते.