Summary of the Book
लोककथा' हा प्रत्येक संस्कृतीचा अनमोल ठेवा असतो. प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीला तो जपण्यासाठी द्यायचा असतो, कारण त्यातून मनोरंजन तर होत असतंच, पण खूप शिकायलाही मिळत असतं. नवीन माहिती मिळते. एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे जात असताना कानगोष्टीसारखं काळानुरूप त्याचं रूप बदलत जातं, पण त्यातला बोध मात्र त्रिकालाबाधितच राहतो. या पुस्तकात रशियन लोककथा वेगवेगळे भारतीय पोशाख घालून तुम्हाला भेटायला आल्या आहेत. वाचून बघा; नक्की आवडतील तुम्हाला !