Summary of the Book
जहानआरा ही मुघल बादशहा शाहजहान व मुमताज यांची मुलगी व औरंजेबाची थोरली बहिण आहे. दिसायला अतिशय सुंदर असलेली जहानआराला अरबी व फारसी भाषा येत होती. वडिलांची ती अतिशय लाडकी होती. वडिलांची देखभाल करीत असे. राज्याविषयी सल्लेही देत असे.
औरंगजेब व तिचे संबंध कधीच सौहार्दाचे नव्हते. तिचा जीव दाराशुकोहवर जास्त होता. शाहाजहाननंतर तो मुघल साम्राज्याचा वारस बनावा, यासाठी तिचा प्रयत्न होता; पण औरंगजेबाने दाराशुकोहचा काटा काढला आणि मुघल बादशहा बनण्याचा मार्ग मोकळा केला.
जहानआराने आयुष्यात अनेक दु:ख भोगली. जवळच्या माणसांचे मृत्यू पाहिले; पण मुघल साम्राज्यासाठी ती कायम कणखर राहिली. प्रियकराविषयी तिच्या मनातील भावना तिने कधीच व्यक्त केल्या नाहीत.
मुघल राजघराण्यातील स्त्रियांप्रमाणेच ती अविवाहित राहिली. जहानआराची ही कहाणी आन्द्रिया वुतेनशोएन या पाश्चात्य लेखिकेने लिहिलेली आहे. तिचे मराठी रुपांतर सुहासिनी देशपांडे यांनी केले आहे. मुघल शाहजादी जहानआराची घुसमट, तडफड, वेदना असहाय्यता व उत्कट प्रेमभावना या कादंबरीतून व्यक्त होते.