Hard Copy Price:
R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
प्रत्येक जण स्वत:ला Good Man किंवा Womanच समजत असतो. म्हणजेच मी चांगला आहे, माझं वाईट होता कामा नये, असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. तरीही वाईट जेव्हा घडतं तेव्हा साहजिकच ते का घडलं? आपल्याला ते टाळता आलं असतं का? दोष कुणाचा? असे प्रश्न मनात उपस्थित होतात.
...या आणि अशा सर्व प्रश्नांचा लेखकाने वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून या पुस्तकातून ऊहापोह केला आहे. उदाहरणे दिलेली आहेत. हे पुस्तक वाचता वाचता नकळत आपल्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत जातात. आपण कसं वागलो नि कसं वागायला पाहिजे हे उमगत जातं.
जगभरातल्या माणसांना सारखेच मार्गदर्शक ठरू शकतील असे काही विचार या पुस्तकात मांडलेले आहेत. साध्या-सोप्या भाषेत. देवावर आणि जगाच्या चांगुलपणावर विश्वास असणार्या माणसाने लिहिलेलं हे पुस्तक आहे.
त्या माणसाने आयुष्याचा बहुतेक काळ इतरांना मदत करण्यात घालवला. पण स्वत:च्या वाट्याला आलेल्या विपरीत, दु:खद घटनेमुळे परमेश्वर, त्याची कृपा; अशा सगळ्याच गोष्टींचा पुन्हा पहिल्यापासून विचार करणं त्याला भाग पडलं आणि मग स्वत:सारख्याच, अनुभवाने पोळलेल्या, घायाळ झालेल्या व्यक्तींसाठी त्याने हे पुस्तक लिहिलं...