Summary of the Book
प्रा. विठ्ठलराव कुळकर्णी हे मुख्यत: आणि मूलत: साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक. त्या विषयावर त्यांनी प्रदीर्घ आणि स्फुट असे विपुल लेखन केले आहे. पण त्याचबरोबर राजकारण, समाजसुधारणा, स्त्रियांचे प्रश्न, क्रीडा, रंगभूमीवरील व चित्रपटातील अभिनय इ. इतर अनेक विषयांत देखील त्यांना तितकाच रस होता.
म्हणूनच एमेलिन पॅंकहर्स्ट, जी. के. चेस्टर्टन, बर्नार्ड शॉ, चार्ली चॅप्लिन, गणपतराव बोडस, गडकरी, टिळक-आगरकर, न्यायमूर्ती छगला यांसारख्या त्या त्या क्षेत्रातल्या अग्रगण्य अशा पाश्चात्य आणि पौर्वात्य व्यक्तीसंबंधीही त्यांनी अनेक लेख लिहिले. त्यातल्या काही निवडक लेखांचा हा संग्रह आहे.
या लेखांवरून प्रा. विठ्ठलराव कुळकर्णी यांच्या आस्था विषयांची विविधता तसेच चिकित्सक दृष्टी आणि उपरोध ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये यांचा वाचकांना प्रत्यय येईल.
रा. भि. जोशी