Summary of the Book
'करूळचा मुलगा' ही दारिद्य्राशी झगडत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आशावादी वृत्तीने केवळ लेखनगुणांच्या बळावर जिद्दीने स्वत:चे जीवन यशस्वी करणाऱ्या लेखकाने सांगितलेली जीवनकथा आहे. एका अर्थाने हे मधु मंगेशकर्णिक यांनी कथन केलेले स्वत:चे चरित्र आहे. अर्थात आत्मचरित्र हे लेखकाचे स्वत:चे चरित्र असले, तरी तुलनेने चरित्रात जी वस्तुनिष्ठता असते ती आत्मचरित्रात अल्प प्रमाणात असते. प्रस्तुत ' करूळचा मुलगा ' या आत्मचरित्रात मधु मंगेश कर्णिक यांनी एका लेखकाचा जीवनप्रवास वर्णन करून सांगितला आहे. त्यामुळे या आत्मचरित्रातील सर्व तपशील जसे त्यांच्या जीवनप्रवासाशी संबंधित आहेत, तसेच लेखक म्हणून होत गेलेल्या त्यांच्या वाढीशी निगडित आहेत.