Summary of the Book
कवितेचा छंदाच्या अंगाने आणि छंदांच्या लयीच्या विचार करताना गवसलेली काही आकलने इथे लेखरूपात प्रकट झालेली आहेत.
छंदःशास्त्राच्या तात्त्विक विवेचनाच्या जोडीने कवितेतील प्रयोगशील स्थित्यंतराचा चिकित्सक व रसाकर्षक मागोवा येथे घेतला आहे.
छंदःशास्त्रासारखा तांत्रिक व म्हणून अवघड समजला जाणारा विषय किती सुगम आणि रसमय होऊ शकतो, याचा प्रत्यय देणारे 'छंदोमीमांसा' कवितेच्या आकलनात नवी भर घालणारे झाले आहे.
डॉ. शुभांगी पातुरकर यांना समीक्षेची नवी दृष्टी 'मराठी मुक्तछंद' आणि 'छंदःशास्त्रीय समीक्षा' ह्या त्यांच्या दोन अभ्यासपूर्ण ग्रंथांप्रमाणे ह्याही ग्रंथाचे वाचक, अभ्यासक स्वागत करतील, हे नक्कीच.